दुर्गा भागवत यांच्या ललित लेखनातील जीवनदर्शन
दुर्गा भागवत या आपल्या लेखनातून निसर्ग जीवनाचे वर्णन करतात. असे असले तरी, सृष्टीच्या निसर्ग चक्रानूसार बदलत जाणाऱ्या घटनांचे वर्णन त्या करतात. त्यांच्याकडे ललित लेखनासाठी असणारी संवेदनशीलता, निरीक्षण क्षमता, चिंतनशीलता, काव्यात्मकता यांचा सुरेख संगम आहे. त्यामुळे त्यांचे ललित गद्य लेखन वेगळे ठरते. एकंदरीत त्यांच्या सर्व लेखन कार्यावरून असे जाणवते की, मराठी ललित गद्य लेखनात दुर्गा भागवत यांनी आपल्या स्वत:चे वेगळेपण सिद्ध केले आहे. दुर्गा भागवत यांनी विपुल प्रमाणात लेखन केले असले तरी, दुर्गा भागवत म्हणजे गद्य लेखन व ललित गद्य लेखन म्हणजे दुर्गा भागवत असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. त्यांच्या ललित गद्यात समाविष्ट होणाऱ्या 'ऋतुचक्र', 'भावमुद्रा', 'व्यासपर्व', 'रूपरंग' व 'पैस' या पुस्तकातून घडणारे जीवनदर्शन यात शोधले आहे.