संतांचे तत्त्वज्ञान
संत म्हटले की, त्याग, ब्रह्मचर्य, अपरिग्रह, संसाराकडे पाठ फिरविणे, प्राणिमात्रांवर दया करणारे, उपवास, आश्रम, अशा काही बाबी आपल्या नजरेसमोर उभ्या राहतात.सर्वसाधारण माणसाला संतांचे विशिष्ट असे तत्त्वज्ञान जाणून घेण्यात रुची नसते. त्यांचे कार्य कोणते? ते कोणता उपदेश करतात? हे जाणून घेण्याचीच इच्छा असते, तसेच एखाद्या तत्त्ववेत्त्याचे तत्त्वज्ञान वाचल्यानंतर या विचारांचा उपयोग काय? असा प्रश्न पडतो. मात्र, संतांचे विचार किंवा संतसाहित्याच्या माध्यमातून तसे होत नाही. संतांचे कार्य, तसेच त्यांच्या उपदेशाचा प्रत्यक्ष व्यवहारात सतत मदत होत असल्याची जाणीव होत राहते.‘संतांचे तत्त्वज्ञान’ या पुस्तकाच्या माध्यमातून जवळजवळ १५ संतांची ओळख व त्यांचे कार्य विशद करण्याचा प्रयत्न या पुस्तकाचे संपादक डॉ. सुनिलदत्त गवरे यांनी केला आहे.