पाश्चात्त्य विचारवंतांचा ईश्वर विचार
पाश्चात्त्य विचारवंतांचा ईश्वर विचार
पाश्चात्त्य विचारवंतांचा ईश्वर विचार
पाश्चात्त्य विचारवंतांचा ईश्वर विचार

पाश्चात्त्य विचारवंतांचा ईश्वर विचार

  • ISBN : 978-93-94269-13-2
  • Author : प्रा. डॉ. सुनीलदत्त गवरे
  • Edition : 22 June 2022
  • Weight : 240
  • Size : 5.5 x 8.5
  • Total Page : 224
  • Delivery : 2-7 business days
  • Pay Using : Cheque / DD
  • Category : Marathi & Literature,
  • Sub Category : वैचारिक पुस्तके,
316 395 20 % OFF
Qty

0 REVIEW FOR पाश्चात्त्य विचारवंतांचा ईश्वर विचार

ADD A REVIEW

Your Rating

पाश्चात्त्य विचारवंतांचा ईश्वर विचार

प्रा. डॉ. सुनिलदत्त गवरे यांनी युरोपियन व अमेरिकन तत्त्वचिंतनातील ‘ईश्वर’ या संकल्पनेचा इतिहास मांडण्याचा प्रयत्न ‘पाश्चात्त्य विचारवंतांचा ईश्वर विचार’ या ग्रंथात केलेला आहे. खुद्द ईश्वराला इतिहास नाही; परंतु ईश्वरविषयक संकल्पनेला निश्चित इतिहास आहे. भाविक व श्रद्धाळू धार्मिकांचा ईश्वर आणि तत्त्वचिंतकांचा ईश्वर, असा भेद तत्त्वचिंतक व तत्त्वज्ञानाचे इतिहासकार करतात. अखिल मानवजातीच्या इतिहासात ‘ईश्वर’ या संकल्पनेला फार महत्त्व आहे. या मौलिक संकल्पनेचा अर्थ पाश्चात्त्य दार्शनिकांनी वा तत्त्वचिंतकांनी कसा वेगवेगळा केलेला आहे, हे पाहणे फारच उद्बोधक आहे. कोणत्याही धर्माचे शुद्ध स्वरूपातील धर्माचरण काही विरळ लोकांच्या जीवनातच दिसून येते. शुद्ध धर्मात नैतिकता व शुद्ध आध्यात्मिकता यांना महत्त्व असते. प्रचलित धर्मात मात्र धर्माचे कर्मकांडात्मक व दंतकथात्मक पैलू जे धर्माचे गौण पैलू असतात, त्यांनाच प्राधान्य दिले जाते. म्हणून तत्त्वचिंतकांनी धर्माची व ईश्वरविषयक विचारांची बौद्धिक चिकित्सा केलेली आहे.