हार-प्रहार (मराठी चारोळी संग्रह )
निंबाजीराव बागूल लिखित हार-प्रहार मराठी चारोळी संग्रहातील ‘चारोळ्या’ खर्या व खड्या जीवनाबोलीचा आविष्कार आहेत. निंबाजीराव बागूल यांनी ‘चारोळी’ या फारशा न रुजलेल्या व गांभीर्याने न स्वीकारल्या गेलेल्या अभिव्यक्तीच्या या घाटाला, सामाजिक आशय, प्रबोधन व परिवर्तनाच्या जीवनाशयाचे वहन किती समर्थपणे करू शकतो, हे दाखवून दिले, हे त्यांचे वैशिष्ट्य आहे.