हरलो पण अंत नाही
मराठी गजल माझ्या वाचनात ती तंत्रातच अडकलेली आहे. गजल लिहिणारेही कुठल्या एका निर्णयावर येऊ शकले नाही त्यामुळे मराठी गजलेचा आशय बाजूला राहतो आणि तंत्राच्या भानगडीत अस्सल गजल दूर-दूर पळून जाते. जनसामान्यांना न समजणारे क्लिष्ट मराठी शब्द गजलेवर स्वार होऊन जातात नि ती सामान्य माणसांपासून फार्कत घेते.
पण, दिलीप सीताराम पाटील यांच्या गजल आविष्कारणात कुठलाही तथाकथित तंत्राचा अडथळा नाही. ती जनसामान्यांची भाषा बोलते आणि त्यांच्या भावभावना अतिशय सोप्या मराठी भाषेत व्यक्त करते. दिलीप सीताराम पाटील यांचे विषयही समाजात सतत डोळ्यांसमोर दिसणाऱ्या घटनांना उद्धृत करतात. त्यामुळे त्यांच्या गजला थेट मेंदूत जाऊन हृदयाला भिडतात आणि त्या वाचकाला आपल्या संवेदना वाटतात हेच या अद्वितीय गजलांचे यश आहे.
- लोकनाथ यशवंत