खान्देश रत्नावलीचा अभ्यास
केळी, कापूस आणि कविता यांनी खान्देश समृध्द असा प्रांत आहे. काव्य अर्थात साहित्याची एक उज्वल परंपरा या प्रदेशाची राहिली आहे. शेती, माती आणि नाती ही येथल्या साहित्याने जोरकसपणे मांडली आहेत. काव्यात्म, कथात्म आणि नाट्यात्म साहित्य प्रकाराचे विपुल लेखन खान्देश प्रांतातील कवी, लेखक, नाटककार अशा सर्व साहित्यिकांनी केलेले दिसते. त्या लेखनप्रकारातील नमुन्यादाखल काही लेख, कविता, व्यक्तिचित्रे यांचा समावेशाने 'खान्देश रत्नावलीचा अभ्यास' हा ग्रंथ आकारास आला आहे.
सर्जनशील लेखनासाठी संस्कृत भाषेत 'काव्य' हा शब्द योजला आहे; तर इंग्रजीभाषेमध्ये 'लिटरेचर' आणि मराठी भाषेत वाङ्मय, सारस्वत, विदग्ध वाङ्मय, ललित साहित्य, साहित्य असे काही शब्दप्रयोग वापरलेले दिसतात.
भाषेचे विद्यार्थी आणि अभ्यासक यांना साध्या-सोप्या आणि सरळ भाषेत वाङ्मय अर्थात साहित्य आणि साहित्याचे प्रकार व खान्देशाचे साहित्य वैभव समजून घेण्यासाठी या ग्रंथाची निश्चितच मदत होईल.
- प्रा. डॉ. सत्यजित साळवे.