मराठा आणि आरक्षण
डॉ. अनिल पाटील यांनी आपल्या अभ्यासपूर्ण विवेचनातून प्रस्तुत पुस्तकात खानदेशातील मराठा समाजाची ऐतिहासिक पार्श्वभूमी, जळगांव जिल्ह्यातील मराठा कुणबी समाजाचा ऐतिहासिक, अभ्यासपूर्ण आणि विवेकशील, व्यासंगी असा साधार आढावा घेतलेला आहे. मराठा समाजाच्या जीवन मरणाचा प्रश्न म्हणजे मराठा आरक्षण, आरक्षण हा नाजूक आणि कळीचा मुद्दा मानला जातो. परंतु डॉ. अनिल पाटील यांनी मराठा आरक्षणाचे ऐतिहासिक परिप्रेक्ष्यातून विवेचन करुन मराठा आरक्षण कसे वस्तुनिष्ठ आणि आवश्यक आहे यांचे मुद्देसुद व साधार विवेचन केलेले आहे. कोपर्डीची दुर्दैवी घटना आणि त्या घटनेचे समाजमनात उमटलेले प्रतिध्वनी, ढवळून निघालेले समाजमन, जळगाव जिल्ह्यात निघालेले मोर्चे, औरंगाबादचा मराठा क्रांती मोर्चा, जळगाव येथील सकल मराठा क्रांती मोर्चा आणि या ऐतिहासिक मोर्चात जिल्ह्यातील समाज बांधवांचा सहभाग, संघभावना, संघप्रवृत्ती, सांघिक प्रयास आणि सांघिक पुरुषार्थ यांचे चपखल शब्दात वर्णन डॉ. अनिल पाटील यांनी प्रस्तुत पुस्तकात केलेले आहे