काहीही...
दै. सकाळमधून लागोपाठ दोन वर्षे प्रकाशित झालेल्या ‘काहीही...’ या शीर्षकाच्या स्तंभलेखनाचा हा संग्रह. त्याच शीर्षकाने वाचकांसमोर हे लेखन येत आहे. या स्तंभलेखनासाठी दै. सकाळच्या संपादकांनी विविध प्रकारच्या समकालीन विषयांची निवड करण्याचे जे स्वातंत्र्य दिले व हा स्तंभ कोणत्याही हस्तक्षेपाविना प्रकाशित होत राहिला ते स्वातंत्र्य, आज दुर्मिळ होत चाललेल्या वर्तमानात अतीव मोलाचे होते. श्रीपाद भालचंद्र जोशी ह्यांचे ह्या स्तंभातील लेखन, विषय, मांडणी, शैली, हे सारेच अभिजात पत्रकारितेच्या दिवसांचे स्मरण करून देणारे आहे. ‘काहीही...’ शीर्षकाच्या या स्तंभातून काहीही ध्वनित होत असले तरीही प्रस्तुत लेखकाचे हे प्रकट-चिंतन हे सुनिश्चित, दिशादर्शक, विश्लेषक आणि विचारप्रवर्तक असे विचार-भाष्य आहे.