दिव्यज्योत
कविता आपल्या स्वानुभवातून लिहिली जाणं याच्यासारखा जीवनातला आनंद कवीला कुठलाही नसतो. जनसमूहात आपल्या जगण्यातून व्यक्त होता येणं, ते व्यक्त होणं सामाजिक मान्यता पावत आपल्या कवितेचा सन्मान केलं जाणं हे आपल्या अर्थात कवीच्या जगण्याला बळ देणारं असतं. कविता करणं तशी फारशी सोपी आणि अवघडही गोष्ट नसते. पण ती आपल्या मनातून, भावनेतून व्यक्त होणं ही मोठी वेगळा असा जीवनानुभव देणारी गोष्ट असते. त्यात आपल्या व्यक्तिमत्वाची स्वतंत्र अशी ओळखही निर्माण होणारी असते. अनेक कविसंमेलनातून आपली कविता सादर करीत आपल्या कवितेचा आशय श्रोत्यांमध्ये आनंद घेणारे कवी किशोर नेवे एक वेगळा असा ठसा उमटवितात. कवी किशोर नेवे यांचा हा कवितासंग्रह वाचकांशी संवाद साधणारा आणि समाज वास्तवाची मांडणी करणारा आहे. निसर्गपर, सामाजिक, सांस्कृतिक कवितातून त्यांचं उलगडणं एक नवी वाट निर्माण करणारे असेच आहे