अग्निपुत्र गुरुवर्य श्री नरेंद्र नीळकंठ जोशी
आजचा काळ हा विज्ञानाचा-तंत्रज्ञानाचा आहे. ही काळाची गरज आहे. आजचा मानव सतत बौद्धिक निकषांवर घासून ज्ञान मिळविण्याच्या चिकित्सक वृत्तीमुळे तो श्रद्धेपासून, धर्मापासून दूर जात आहे. त्यामुळे सर्व भौतिक सुखे मिळून सुद्धा तो मनःशांती हरवून बसला आहे. ह्या मानसिक अवस्थेतून बाहेर पडण्यासाठी त्याला अध्यात्म मार्गावर चालण्याची गरज आहे. बाबांनी भक्तांच्या समस्या सोडवून त्यांच्या करवी कार्य करून घेण्यास सुरुवात केली आहे. त्यांच्या स्वतःच्या दैनंदिन जीवनाला शास्त्राची, श्रद्धेची, तत्त्वज्ञानाची बैठक आहे. त्यामुळे ते शास्त्राला धरून नित्य धर्माचरण करतात, आचारविचार पाळतात. तीच त्यांची रोजची उपासना-तपश्चर्या होय.