धावपट्टीवरचा अनोखा प्रवास
कविता, कथा आणि कादंबरी या क्षेत्रात संचार करून आपले स्वतंत्र अस्तित्व निर्माण करणारे राजेंद्र पारे हे मराठी साहित्य क्षेत्रातील महत्त्वाचे साहित्यिक आहेत. त्यांच्या साहित्यलेखनातून ते स्वतंत्र प्रतिभेचे लेखक असल्याचे सिद्ध झालेले आहे. प्रेम ह्या अडीच अक्षरी शब्दात प्रचंड ताकद आहे. असे म्हणतात की, प्रेमामध्ये सात घोड्यांची ताकद असते. अशी ताकद नैराश्याने ग्रासलेल्या नायकाला मिळते नि त्या ताकदीतूनच ‘धावपट्टीवरचा अनोखा प्रवास’ सुरू होतो. हा प्रवास राजेंद्र पारे यांनी केवळ वाचनीयच केला नसून त्यांनी ही वाट संघर्षशील केली आहे म्हणून त्यांच्या लेखनाची वाट महापुरुषांच्या समृद्ध परंपरेतील आहे.
- प्रा. डॉ. संजय कांबळे
मराठी विभाग, राणी चन्नम्मा विद्यापीठ,
बेळगावी, कर्नाटक.