श्रम साफल्य
पंतांना विचार करता जाणीव झाली की, जग किती स्वार्थी आहे. लोक उगवत्या सूर्याला नमस्कार करतात आणि अडचणीचे वेळी स्वकीय सुद्धा दूर सरतात म्हणून समाजात काही तरी बदल करावा यादृष्टीने त्यांनी एक जनजागरण शिबीर घ्यावयाचे ठरविले. आपल्या स्वानुभवाने तरुण पिढीपुढे आदर्श ठेवायचे ठरविले आहे. तसेच अडल्या नडल्यांना मदत व्हावी म्हणून त्यांनी गावात एक सार्वजनिक ट्रस्ट स्थापन करून गरजवंतांना मदत व्हावी म्हणून एक लाख रूपयाची देणगी कल्याणकारी फंडास दिलेली आहे. पंतांकडे आज जे काही आहे ते त्यांच्या सद्मार्गाने वागण्याच्या पुण्याईमुळे आहे. त्यांचा आदर्श समाजातील नवयुवकांनी घेण्यासारखा आहे व त्यातून सर्वांनी बोध घ्यावा अशी पंतांची तळमळ आहे.