बाबुराव गायकवाड यांचे लघुनिबंध : समीक्षा
‘हलकं फुलकं, पुन्हा एकदा हलकं फुलकं, तिसर्यांदा हलकं फुलकं’ ललित लेखांची ही त्रिस्तरीय शृंखला, मालिका वाचकांच्या मनाचा आणि त्यांच्या जगण्याशी निगडीत असणार्या दैनंदिन जीवनाचा जो ठावा घेते, समतोल मांडते तो खर्या अर्थाने मनामनात आपलाच आपल्याला शोधण्याचा प्रयत्न करीत आत्मशोधाची एक वाट निर्माण करीत जातो. साध्या, सोप्या गोष्टीतून, अनुभवातून आपल्याला शिकण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत. ज्यांतून आपल्या जगण्याला अर्थ प्राप्त जातो. जगणं सुकर आणि आणि समाधानी होत असते. हलकं फुलकं लघुनिबंधाच्या संपादनाच्या वैचारिक मंथनातून जी मांडणी प्रा. डॉ. बाबुराव गायकवाड सरांच्या लेखनशैलीचा त्यांच्या वास्तव आणि परखड मांडणीचा, त्याच्या स्वानुभवाचा विचार ज्या लेखकांनी मांडला आहे. तो विचार निश्चितपणे सामाजिक स्वास्थाच्या दृष्टीने महत्त्वाचा वाटतो.
- डॉ. मिलिंद विनायक बागूल
जळगाव (महाराष्ट्र)