आदिवासी मावची बोली समाज, संस्कृती आणि परिवर्तन
आजच्या आधुनिक युगात शिक्षण क्षेत्रामध्ये क्रांती घडून आपल्याला बदल जाणवतो. तोच बदल महाराष्ट्रातील आदिवासी जमातीत जाणवतो. त्यात भिल्ल जमात मागे नाही. पारंपरिक संस्कृती जाणून समाजामध्ये परिवर्तन घडवून आणलेले आहे. भिल्ल जमातीची मावची ही उपजात आहे. आदिवासी मावची हे बोली समाज, संस्कृती जपून थोडासा परिवर्तन करुन जीवन जगतांना दिसत आहे. हे या पुस्तकात नमूद केलेले आहे. या पुस्तकात एकूण नऊ प्रकरणे आहेत. आदिवासींची ओळख, मावची बोली, प्रदेश वर्णन केलेला आहे. पुढे त्यांचा समाज आणि संस्कृतीमार्फत ओळख करुन दिलेली आहे. त्यांचे सण-उत्सव, देवी-देवता या सगळ्यांबरोबरच त्यांचे परिवर्तन जाणवते ते नमूद केले आहे. लोककला व लोकगीते यामधून या बोलीभाषेच्या संस्कृतीचे दर्शन जाणवते. विविध विवाहाच्या पद्धतीतून पारंपरिक विवाह पद्धतीमधील रुढी, परंपरा कळते. या बोली भाषिक समाजाच्या विधीतून त्यांचे संस्कृतीचे दर्शन घडते आणि शेवटी या समाजाचा दृष्टीक्षेप जाणवतो. या विविध बाबींमधून आपल्याला या पुस्तकाची महती कळते. याशिवाय या बोलीभाषिक प्रदेशाचा नकाशा, सण-उत्सव, विधी, नृत्य, यांची छायाचित्रे दाखविली आहेत.