गोष्ट फुफाची आणि इतर बालकथा
गोष्ट फुफाची आणि इतर बालकथा
गोष्ट फुफाची आणि इतर बालकथा
गोष्ट फुफाची आणि इतर बालकथा

गोष्ट फुफाची आणि इतर बालकथा

  • ISBN : 978-93-91712-37-2
  • Author : जोसेफ तुस्कानो
  • Edition : 19 September 2023
  • Weight : 150
  • Size : 7 x 10
  • Total Page : 56
  • Delivery : 2-7 business days
  • Pay Using : Cheque / DD
  • Category : Marathi & Literature,
  • Sub Category : मुलांची पुस्तके,
140 175 20 % OFF
Qty

0 REVIEW FOR गोष्ट फुफाची आणि इतर बालकथा

ADD A REVIEW

Your Rating

गोष्ट फुफाची आणि इतर बालकथा

‘गोष्ट फुपाची आणि इतर बालकथा’ आनंद देणार्‍या असून, आनंद व मनोरंजनाबरोबरच अंतर्मुख करणार्‍या आहेत. या प्रत्येक गोष्टीतून विविध गुणांचा परिचय होतो. चांगल्या तत्त्वांचा बोध होतो. ग्रीक तत्त्वज्ञ सॉक्रेटीस यांनी ज्ञानाची व्याख्या ‘ज्ञान म्हणजे सद्गुण’ अशी केली आहे. आपल्या शिक्षणातून ज्ञान मिळते का? फक्त माहिती मिळते. अभ्यासक्रम माहितीपूर्ण असतो. त्याच्या अभ्यासामुळे परीक्षेची तयारी होते. परीक्षेत उत्तम गुण मिळतात. यश मिळते. व्यावहारिकदृष्ट्या व्यक्तिमत्त्वाचा विकास घडतो. पण नैतिक विकास कितपत होतो? शिक्षणातून सद्गुण किती रुजतात? म्हणूनच शालेय जीवनात वाचण्यासाठी ह्या गोष्टी लिहिल्या आहेत.

‘गोष्ट फुपाची’ यात फुलपाखरूंमध्ये बालमन कसे रमते, बागडते अन् त्याविषयी माहितीही मिळते. फुलपाखराचे वजन पाचशे मिलिग्रॅम असते. ते स्थलांतर करते. याबाबतची माहिती ‘गोष्ट फुपाची’ या गोष्टीतून बालमनास उपयुक्त ठरेल. अल्बर्ट आइन्स्टाइन मोठे संशोधक होते. १९०५ मध्ये त्यांनी ‘सापेक्षतावाद, ब्राउनियन गती, फोटोइलेक्ट्रिक परिणाम’ या विषयांवरचे सिद्धांत मांडले. ते वर्ष ‘चमत्काराचे वर्ष’ म्हणून गाजले. त्यांच्या जीवनकार्याविषयी ‘आठवणी आइन्स्टाइनच्या’ या गोष्टीत उकल केली आहे. 


RELATED BOOKS

डफडं

180 225 20 %