संस्कार विज्ञानाचे, विवेकाचे!
आपल्यावर विविध मार्गांनी संस्कार होत असतात. संस्कार या सवयी असतात. त्या प्रतिक्षिप्त क्रियांप्रमाणे घडून येतात. परंतु काळ बदलत गेला. धार्मिक संस्कृती मागे पडली आणि विज्ञान संस्कृतीने आपल्या जीवनावर पगडा घेतला. विज्ञान-तंत्रज्ञानाच्या प्रगतीतून आपल्याला सुखसोयी प्राप्त होत गेल्या. साहजिकच आपली मानसिकता ही वैज्ञानिक दृष्टिकोनाने व्यापलेली असणे क्रमप्राप्त झाले. धर्मपुराणातील संकल्पना आपण विज्ञानाच्या कसोटीला तपासून पाहिल्या पाहिजेत.
पाल्यांच्या कृतीमुळे मुलांवर शैक्षणिक संस्कार आपोआप होऊन ते अभ्यासात पारंगत होतात. अवाढव्य ब्रह्मांडात राहून मनुष्याने ज्ञान मिळविल्यामुळे त्याची वैज्ञानिकदृष्ट्या विचार करण्याची बुद्धी प्रगत झाली. तंत्रज्ञानाचेही आकलन करता आले. मात्र, सध्या मुलांवर पुस्तकी ज्ञान दिले जाते. मुलांना फक्त पुस्तकी ज्ञान देऊ नका. दुनियेतील विचारधारांवर चालायचे असल्यास आणि बुद्धी तेज करण्याचे काम विज्ञान आणि विज्ञानाचे शिक्षणच करू शकते. मुलांमध्ये लहानपासून विज्ञानिष्ठ दृष्टिकोन रुजावा, त्यांना विज्ञानाच्या वाटेवरचे वाटसरू करून घ्यावे. विज्ञान परिषदा, बालवैज्ञानिक स्पर्धा, विज्ञान प्रदर्शने अशा अनेक माध्यमांतून विद्यार्थ्यांत विज्ञानाचे संस्कार रुजवावाते. मुलांमध्ये विज्ञानाची गोडी लागावी यासाठी झटण्याची गरज आहे. प्रत्येक विद्यार्थी विज्ञाननिष्ठ बनायला हवा. तो विज्ञानाच्या वाटेवरचा वाटसरू बनायला हवा.