एव्हरी डे इज माय डे डॉ. कलाम कन्सेप्ट ऑफ सक्सेस
जीवन जगण्याची संधी आपणास मिळाली पण कसं जगावं ? हे सांगण्याच्या हेतूने हे पुस्तक लिहिले. पुस्तकात मांडलेले विचार नक्कीच काही तरी प्रेरणा देतं. 'प्रत्येक दिवस माझा आहे' असा विचार करुन जगण्यातच खरा आनंद आहे. समाजात जे चहबाजुंनी नैराश्य दिसत ते आपण सर्व अनुभवतो. त्याचा परिणाम आपल्यावर ही होत असतो. अशा वेळेस आपण काय करायला हवे हे सांगण्याचा प्रयत्न या पुस्तकाच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न केला आहे. सर्व वयोगटातील लोकांसाठी उपयुक्त ठरेल अशा रितीने विचार मांडला आहे.
डॉ. कलाम यांचे विचार म्हणजे गीता, कुराण, रामायण यांचा संगम म्हटला पाहीजे. आजच्या युगात जीवन कसं जगाव ? हे ही ते सांगतात व जीवन कसं असावं? ह्यावर ही प्रकाश टाकतात. म्हणूनच त्यांच्या विचरांना आधार धरुन मी माझे विचार वेगवेगळ्या प्रकरणात मांडले आहे. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे 'Every Day is My Day' ही वृत्ती आपल्याजीवनाला आकार देईल. चारित्र्य संपन्न समाजाची अत्यंत गरज आहे. आणि त्यासाठी प्रत्येकालाच मेहनत घ्यावी लागेल. प्रत्येकाला आपला आवाज ऐकावा लागेल तेव्हाच आपण बहिरेपणाच सोंग घेऊन बसलेल्या जगाला जागवू शकू. आधुनिक जगाने आपल्या पदरात ज्या समस्या टाकल्या आहेत या समस्यांच उत्तर कदाचित तुम्हाला हे पुस्तक वाचल्यानंतर सापडेल.